आंब्याचे लोणचे, कैरीचे लोणचे, मिरचीचे आणि लिंबाचे लोणचे आपण नेहमीच खातो. पण अननसाचे लोणचे कधी खाल्ले आहे का? अनेकांना अननसाचे लोणचे कसे बनवायचे, हे माहितीही नसेल. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी तेलाचा एकही थेंब न वापरता एका दिवसात तयार होणाऱ्या अननसाच्या लोणच्याची रेसिपी सांगितली आहे.
तेलाशिवाय चटपटीत चव
या लोणच्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते बनवण्यासाठी तेलाची अजिबात गरज नाही आणि ते खाण्यासाठी वाट पाहावी लागत नाही. एका दिवसातच हे लोणचे तयार होते. अननसाच्या नैसर्गिक गोडसर चवीला मसाल्यांची चटपटीत जोड मिळाल्याने हे लोणचे जेवणाची चव वाढवते.
नेहमीच्या लोणच्यांपेक्षा वेगळे
नेहमीची लोणची तयार होण्यासाठी अनेक दिवस लागतात आणि त्यात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याच्या तुलनेत अननसाचे हे लोणचे झटपट तयार होते. त्यामुळे ज्यांना तेल कमी खायचे आहे किंवा ज्यांना नवीन चव चाखायची आहे, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.
Leave a Reply