बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीचा शाही विवाह अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. या अविस्मरणीय लग्नासाठी नदवां गावात जय्यत तयारी सुरू आहे. लग्नाच्या तयारीने संपूर्ण गावाचे वातावरणच बदलून गेले आहे.
लग्नाची जय्यत तयारी
या शाही विवाहासाठी २५ लाख मिठाई आणि ५० लाख रसगुल्ले तयार करण्यात येत आहेत. पाहुण्यांसाठी १५० पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल दहा लाख पाहुण्यांची व्यवस्था या लग्नासाठी केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिठाई तयार करण्यासाठी १५०० क्विंटल साखर वापरली जात आहे. संपूर्ण गावाला नवरीसारखे सजवण्यात आले आहे.
गावागावातून बघ्यांची गर्दी
हे महागडे लग्न पाहण्यासाठी बिहारमधून लोक येत आहेत. गावागावातून बघ्यांची गर्दी होत आहे. आमदाराच्या मुलीच्या या शाही लग्नाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. पाच दिवसांवर आलेल्या या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply