सोनं खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत आहे. आजही सोन्याच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी चांगली संधी मिळत आहे. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. अशा वेळी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एक तोळा सोनं तब्बल ५ हजार १२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १ लाख २५ हजार ५७० रुपये झाला आहे. केवळ सोनंच नाही, तर चांदीच्या दरातही घट झाली आहे. १०० ग्रॅम चांदीच्या किमतीत ५०० रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीची किंमत १०० ग्रॅमप्रमाणे १७ हजार ५०० रुपये इतकी आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता सोन्या-चांदीच्या दरांवर लागले आहे.
२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर
१ ग्रॅम सोन्याचा आजचा दर १२ हजार ५५७ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४५६ रुपये, १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख २५ हजार ५७० रुपये आणि १०० ग्रॅम सोन्याचा दर १२ लाख ५५ हजार ७०० रुपये आहे.
२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे दर
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर १ ग्रॅमसाठी ११ हजार ५१० रुपये, ८ ग्रॅमसाठी ९२ हजार ८० रुपये, १० ग्रॅमसाठी १ लाख १५ हजार १०० रुपये आणि १०० ग्रॅमसाठी ११ लाख ५१ हजार रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १ ग्रॅमसाठी ९ हजार ४१८ रुपये, ८ ग्रॅमसाठी ७५ हजार ३४४ रुपये, १० ग्रॅमसाठी ९४ हजार १८० रुपये आणि १०० ग्रॅमसाठी ९ लाख ४१ हजार ८०० रुपये आहे.
Leave a Reply