मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार २३ नोव्हेंबर रोजी होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पश्चिम बंगालमधील मोठ्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात शमिक भट्टाचार्य यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.
२३ नोव्हेंबरला विस्ताराची शक्यता
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत उच्चस्तरीय बैठका झाल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे. पश्चिम बंगालमधील बड्या नेत्यांना संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विस्तार नेमका कधी होणार आणि कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही संधीची अपेक्षा
महाराष्ट्रासह बिहार आणि उत्तर प्रदेशालाही मंत्रिपदे मिळण्याची अपेक्षा आहे. या राज्यांतील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे. बड्या नेत्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून रेसमध्ये कुणाचे नाव आहे, याबाबत उत्सुकता आहे.
Leave a Reply