एचसीएल ८२ व्या राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल मानांकित रथिका सुथंथिरा सीलन आणि महाराष्ट्राच्या निरुपमा दुबे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा स्क्वॉश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित केली आहे आणि वांद्रे येथील ऑटर्स क्लबच्या काचेच्या कोर्टवर सुरू आहे.
महिला गटात रथिका आणि निरुपमाचा सहज विजय
गुरुवारी झालेल्या महिला गटातील उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित रथिका सुथंथिरा सीलन याने आपल्याच राज्याच्या व्ह्योमिका खंडेलवाल यांचा 11-3, 11-2, 11-9 असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला.
महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित निरुपमा दुबे यानेही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. तिने महाराष्ट्राच्याच अश्मिरा बेग यांचा ११-3, ११-3, ११-2 असा एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
वसुंधरा नांगरे यिला मात्र विजयासाठी चांगलीच झुंज द्यावी लागली. तिने उन्नती त्रिपाठी यिला 11-7, 7-11, 13-11, 9-11, 11-9 असा पाच गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात हरवले. अनिका दुबेने आशी शाह यिला, तर आद्या बुधियाने दिवा शाह यिला मात करत पुढील फेरी गाठली.
पुरुष गटात यश फडतेची आगेकूच
पुरुष गटात ओम सेमवालने तुषार शहाणी यांचा 12-10, 11-2, 11-4 असा पराभव केला. राहुल बैथाने हृदान शाहवर 11-4, 11-4, 11-5 अशी मात केली. गोव्याच्या यश फडतेने आर्यन प्रताप सिंग यांना 11-4, 11-5, 11-0 असे सरळ गेममध्ये हरवून अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. वेदांत पटेलने पुरव रांभिया यिला 12-14, 11-4, 12-10, 11-9 असा चुरशीच्या सामन्यात हरवून उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली.
या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील खेळाडूंमध्ये पुढील फेरीसाठी चुरस वाढली असून आगामी सामने अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांचाही चांगला पाठिंबा मिळत असल्याने खेळाडूंनाही चांगले प्रोत्साहन मिळत आहे.
Leave a Reply