शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कार नदीत कोसळली; २९ वर्षीय युवकाचा मृत्यू, लग्न तोंडावर

अंबाझरी पुलावर नियंत्रण सुटल्याने कार कठडा तोडून नाग नदीत कोसळली. त्यात २९ वर्षीय कनव सहानी यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच त्यांचे साक्षगंध झाले होते.

कार नदीत कोसळली; २९ वर्षीय युवकाचा मृत्यू, लग्न तोंडावर

नागपुरात गुरुवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात एका २९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अनियंत्रित कार पुलावरील कठडा तोडून नाग नदीत कोसळली. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवेकानंद पुतळ्याजवळील ओव्हरफ्लो पॉइंट येथे घडली. मृत तरुणाचे नाव कनव अनुप सहानी (वय २९, रा. थापर मार्ग, क्लार्क टाऊन) असे आहे. त्यांच्या फेसबुक खात्यावर ते ए. के. सहानी इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असल्याची नोंद आहे.

पहाटे चार वाजता घडला अपघात

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कनव यांचे आई-वडील दिल्लीला गेले होते. त्यामुळे ते घरी एकटेच होते. गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ते एमएच-४९-सीडी-८३९० क्रमांकाच्या कारने जात होते. अंबाझरी पुलावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार पुलावरील कठडा तोडून थेट ओव्हरफ्लो पॉइंटमध्ये कोसळली.

या अपघातात कारचा काही भाग चक्काचूर झाला. कनव गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. कनव यांच्याकडे आढळलेल्या आधार कार्ड आणि कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली.

लग्नापूर्वीच काळाची झडप

काही दिवसांपूर्वीच कनव यांचे साक्षगंध झाले होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह होणार असल्याने सहानी कुटुंबात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, लग्नापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने संपूर्ण कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

कनव काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. बुधवारी रात्री ते नागपुरात परतले. त्यानंतर ते कुणासोबत गेले, कुठे गेले आणि अपघातापूर्वीच्या काही तासांत नेमके काय घडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भातील माहिती गोळा करण्यात येत असून, पुढील तपास सुरू असल्याचे अंबाझरी पोलिसांनी सांगितले.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance