जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ५०० रुपयांची घट झाली, तर चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
जळगावच्या बाजारात २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर १ लाख ३० हजार ५०० रुपये प्रति तोळा इतका आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू असून, दररोज किमती कमी होत आहेत. सराफा बाजारात या चढ-उतारावरून चर्चेला उधाण आले आहे.
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याने खरेदीदार संभ्रमात होते. मात्र, सध्याच्या घसरणीमुळे सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ असल्याचे अनेकांचे मत आहे. येत्या दिवसांत दर कसे राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply