बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच तिच्या हटके फॅशन सेन्सचीही नेहमी चर्चा होते. यावेळी तिने काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये बोल्ड, क्लासी आणि स्टायलिश अंदाज सादर केला आहे.
मृणालने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस आणि डीप नेकलाइन असलेला टॉप परिधान केला आहे. या टॉपला तिने हाय-वेस्ट ब्लॅक फ्रिंज स्कर्टसोबत पेअर केले आहे. स्कर्टवरील लांब आणि चमकदार फ्रिंज डिझाइनमुळे तिच्या संपूर्ण लूकला हटके आणि आकर्षक अंदाज मिळाला आहे.
ज्वेलरी आणि मेकअपचा खास अंदाज
आऊटफिटला खास बनवण्यासाठी मृणालने सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची निवड केली आहे. गळ्यात वेगवेगळ्या डिझाइनचे लेयर्ड नेकलेस, पेंडंट असलेली लांब चेन, कानात स्टायलिश इअररिंग्स, हातात सोनेरी बांगड्या आणि बोटात स्टेटमेंट रिंग असा तिचा दागिन्यांचा लूक आहे.
मेकअपमध्ये तिने स्मोकी आय मेकअप, गडद आयलायनर, मस्कारा आणि न्यूड पिंक लिपस्टिकची निवड केली आहे. चेहऱ्यावर ग्लोई बेस ठेवत तिने मेकअपला सॉफ्ट आणि ग्लॅमरस टच दिला आहे. मोकळे, लांबसडक आणि सरळ केस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. पायात तिने ब्लॅक पॉइंटेड-टो हील्स परिधान केल्या आहेत, ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिक एलिगंट आणि फॅशनेबल दिसत आहे.
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
मृणालने या फोटोंना ‘नॉयर, विथ अ फेमिनिन ट्विस्ट!’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत असून तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असून तिचे इन्स्टाग्रामवर 16.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
मृणालने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली. ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेतील बुलबुलच्या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर तिने 2014 मध्ये ‘विट्टी दांडू’ या चित्रपटांमधून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. हिंदीसोबतच तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपले स्थान निर्माण केले आहे.
Leave a Reply