बिहारच्या अररिया जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा भीषण कार अपघात झाला. लग्न ठरवण्याचा कार्यक्रम आटोपून सात जण कारमधून घरी परतत होते.
पुलाजवळ नियंत्रण सुटले
पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाचा कठडा तोडून मरिया नदीत कोसळली. या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एकाला सुखरूप वाचवण्यात यश
या घटनेत एका व्यक्तीला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. अपघातामुळे मृतांच्या गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Leave a Reply