लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट पुन्हा सुरू झाल्याचा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये अपात्र ठरलेल्या लाडकी बहीण लाभार्थींना पुन्हा अर्ज भरता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
## मेसेजमध्ये नेमका काय दावा
व्हायरल होत असलेल्या मेसेजनुसार, सरकारने पुन्हा ई-केवायसीसाठी वेबसाईटवर सेवा सुरू केली आहे. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी भरलेली नाही, त्यांना पुन्हा अर्ज भरता येणार असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.
## लाभापासून वंचित महिलांमध्ये संभ्रम
बऱ्याच महिलांची ई-केवायसी झालेली नसल्याने त्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. खरंच सरकारने पुन्हा ई-केवायसीसाठी वेबसाईटवर सेवा सुरू केली आहे का, याची पडताळणी सुरू आहे. पडताळणीनंतरच या मेसेजमागील सत्य समोर येईल.
Leave a Reply