BRICS+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांनी आपली छाप पाडली आहे. या महोत्सवात भारतीय सिनेमाचा गौरव झाला असून दोन भारतीय कलाकृतींना सन्मान मिळाला आहे.
‘हप्पन सांगवाला’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार
‘हप्पन सांगवाला’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान भारतीय लघुपट क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी मानला जात आहे. लघुपटांच्या माध्यमातून भारतीय कथाकथन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचत असल्याचे यातून दिसून येते.
‘स्नो फ्लॉवर’लाही विशेष सन्मान
छाया कदम आणि वैभव मांगले यांच्या ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटालाही विशेष महोत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या दोन्ही सन्मानांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. BRICS+ महोत्सवात मिळालेले हे यश भारतीय सिनेमासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.
Leave a Reply