गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सातारा जिल्हा बँकेत शिंदे गटाची खेळी! भाजपला धक्का

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. सर्वाधिक संचालक असतानाही भाजपला अध्यक्षपद मिळवता आले नाही.

सातारा जिल्हा बँकेत शिंदे गटाची खेळी! भाजपला धक्का

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. बँकेत भाजपचे सर्वाधिक संचालक असतानाही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपच्या हातातून गेली आहेत. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी खेळी करत हे यश मिळवले आहे.

बहुमताचे गणित कसे जुळले?

सातारा जिल्हा बँकेत एकूण 21 सदस्यांसाठी निवडणूक झाली होती. त्यात भाजपाचे सर्वाधिक 9 सदस्य निवडून आले, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 8 तर शिवसेना शिंदे गटाचे 4 सदस्य निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्ष भाजपाचाच होणार असा अंदाज लावला जात होता.

मात्र शंभूराज देसाई यांनी डाव साधला. राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेनेचे चार असे एकत्र करून देसाई यांनी बहुमताचे गणित जुळवले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने अध्यक्षपदाचा उमेदवारच दिला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची अध्यक्षपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सदस्यांची संख्या अधिक असतानाही देसाई यांच्या खेळीमुळे भाजपला आपला अध्यक्ष निवडून आणता आला नाही.

जिल्हा परिषद निवडणुकीचा वचपा

याचबरोबर शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा वचपाही काढला आहे. मार्च महिन्यात सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांना बाजूला ठेवून भाजपचा अध्यक्ष केला होता. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडताना मोठा गदारोळही झाला होता. मतदानासाठी आलेल्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अपहरणाच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवरूनच अटक झाली होती.

आता त्याचाच बदला शंभूराज देसाई यांनी घेतला आहे. भाजपचे सर्वाधिक सदस्य असताना देखील सातारा जिल्हा बँकेत भाजपला दूर ठेवण्यात त्यांना यश मिळवले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘आगे आगे देखो होता है क्या?’ असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance