सातपूर येथे नाशिक जिल्हा सीटूतर्फे पीएफ आयुक्त मनोज कोळी यांना निवेदन देण्यात आले. निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा किमान ९ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना ७५ टक्के पेन्शन देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
महागाईत पेन्शन अपुरी
निवेदनात म्हटले आहे, की सध्याच्या महागाईच्या काळात मिळणारी पेन्शन अपुरी पडत असून अनेक निवृत्त कामगारांना औषधोपचार आणि कुटुंबाचा खर्च भागविताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे किमान ९ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करणे आवश्यक आहे. पेन्शनधारकाच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळते. ही परिस्थिती टाळण्यासाठी वारसांना ७५ टक्के पेन्शन देण्याची तरतूद लागू करावी, अशीही मागणी करण्यात आली.
निवेदन देताना उपस्थित
या वेळी जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, अरविंद शहापुरे, मोहन जाधव, ज्ञानेश्वर माळी, दिलीप भोळे, गोविंद देसले, तानाजी डोके आदी उपस्थित होते.
Leave a Reply