बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

फक्त १० रुपयांत टाईल्स चमकवा; सोपी ट्रिक जाणून घ्या

घरातील टाईल्सवरील चिकटपणा, काळे डाग आणि धूळ अवघ्या दहा रुपयांत दूर होतात. बोरॅक्स पावडर, व्हिनेगर आणि साबणाच्या मिश्रणाने टाईल्स पुन्हा नव्यासारख्या चमकतात.

फक्त १० रुपयांत टाईल्स चमकवा; सोपी ट्रिक जाणून घ्या

घर किंवा ऑफिस नीटनेटके दिसण्यासाठी टाईल्स स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या टाईल्स दिसायला जितक्या सुंदर असतात, तितकीच त्यांची स्वच्छता राखणे कठीण असते. रोजच्या वापरामुळे टाईल्सवर चिकटपणा, काळे डाग आणि धूळ साचते, जी साफ करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. पण एका सोप्या ट्रिकने तुम्ही अवघ्या १० रुपयांत टाईल्स पुन्हा नव्यासारख्या पांढऱ्याशुभ्र चमकवू शकता.

बोरॅक्स पावडरचा वापर

घरातील किंवा ऑफिसमधील टाईल्स खराब झाल्या असतील, तर तुम्ही १० रुपयांची बोरॅक्स पावडर खरेदी करा. एका बादलीमध्ये बोरॅक्स पावडरमध्ये साबण आणि व्हिनेगर मिसळा. हे लिक्विड टाईल्सवर ओता आणि ब्रशने घासा. साधारण अर्ध्या तासानंतर तुम्ही कोमट पाण्याने टाईल्स स्वच्छ धुवून घ्या. यामुळे टाईल्स पांढऱ्याशुभ्र, चकचकून निघतील.

अमोनिया पावडर आणि व्हिनेगर

टाईल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अमोनिया पावडर देखील वापरू शकता. एका बादलीमध्ये अमोनिया पावडर आणि व्हिनेगर मिक्स करा. हे लिक्विड नंतर टाईल्सवर ओता आणि ब्रशने घासा. यामुळे लादीवरील घाण, डाग आणि जंतू निघून जातील.

व्हिनेगर आणि पाण्याचा स्प्रे

टाईल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि पाण्याचा देखील वापर करू शकता. एका स्प्रेच्या बाटलीमध्ये व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा. नंतर हा स्प्रे खराब झालेल्या टाईल्सवर मारा. या सोप्या पद्धतींनी कमी खर्चात टाईल्स पुन्हा नव्यासारख्या चमकवता येतात.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance