राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये द्वारका सर्कलवरील अंडरपासचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, तर अक्कलकोटमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईत थंडीची चाहूल लागली असून किमान तापमानात घट झाली आहे.
अक्कलकोटमध्ये एफडीएची कारवाई
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानांमधून 850 किलो मिठाई जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
रिक्षाचालकांना ई-रिक्षाचा पर्याय
सीएनजीच्या वाढत्या दरामुळे त्रस्त असलेल्या रिक्षाचालकांना आता पर्यावरणपूरक ई-रिक्षाचा पर्याय खुला होणार आहे. रिक्षाचालकांना जुन्या वाहनांच्या मोबदल्यात ई-रिक्षा घेण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ आणि कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे.
शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चौदावा स्मृतिदिन आहे.
Leave a Reply