महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत येण्याचं निमित्त दिलं आहे. यावेळी त्यांनी प्रेम आणि नातेसंबंध या विषयावर भाष्य करताना असं विधान केलं, ज्यामुळे समाजात नवा वाद सुरू झाला आहे.
एका प्रवचनादरम्यान बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत. त्यांचं प्रेम हे पैशांशी जोडलेलं असतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रेम या विषयावर बोलताना ते म्हणाले, प्रेम वगैरे या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. अनेकदा तरुण मुलांना वाटतं की मुली आपल्यावर प्रेम करतात, पण प्रत्यक्षात तसं नसतं, असंही त्यांचं म्हणणं आहे.
प्रेमाची त्यांची वेगळी व्याख्या
या वेळी इंदुरीकर महाराजांनी प्रेमाची स्वतःची अशी एक व्याख्याही सांगितली. लव्ह इज मनी अँड मनी इज लव्ह, मनी इज लाइफ अँड लाइफ इज मनी, अशा शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं. म्हणजेच प्रेम म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे प्रेम, असं त्यांचं म्हणणं आहे.
इंदुरीकर महाराज याआधीही आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या या ताज्या विधानामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक पातळीवर त्यांच्या मतांवर चर्चा सुरू झाली आहे. प्रेम, पैसा आणि नातेसंबंध यांबद्दलच्या त्यांच्या या मतावर समाजमाध्यमांवरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Leave a Reply