मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मुंबईत धावणार 5 हजार ई-रिक्षा! उबरचा मोठा निर्णय

सीएनजीच्या वाढत्या दरामुळे त्रस्त रिक्षाचालकांना ई-रिक्षाचा पर्याय मिळणार आहे. उबरने येत्या वर्षभरात मुंबईत पाच हजार ई-रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत धावणार 5 हजार ई-रिक्षा! उबरचा मोठा निर्णय

सीएनजीच्या वाढत्या दरामुळे त्रस्त असलेल्या रिक्षाचालकांना आता पर्यावरणपूरक ई-रिक्षाचा पर्याय खुला होणार आहे. रिक्षाचालकांना जुन्या वाहनांच्या मोबदल्यात ई-रिक्षा घेण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ आणि कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या वर्षभरात मुंबईत पाच हजार ई-रिक्षा सुरू करण्याचा निर्णय उबरने घेतला आहे. यामुळे रिक्षाचालकांना रोजचा खर्च भागवणे सहजशक्य होणार आहे.

अर्थशॉट वीकच्या पार्श्वभूमीवर वांद्रे कुर्ला संकुलात सोमवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ईव्ही ऑटो अ‍ॅडव्हान्टेज’ या उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक रिक्षा खरेदीचा आर्थिक भार कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी उबर आणि महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. उबरचे ग्लोबल हेड ऑफ मोबिलिटी प्रदीप परमेश्वरन आणि महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीच्या व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा यांनी या भागीदारीची माहिती दिली.

चालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

इलेक्ट्रिक रिक्षा खरेदी करताना चालकांसमोर असलेली आर्थिक अडचण, वाहन बदलण्याचा खर्च आणि नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास चालकांचा वाहन चालवण्याचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर शहरी भागातील प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांनाही मदत होणार आहे, असे उबरच्या वतीने सांगण्यात आले.

‘कनेक्टेड जर्नीज’ सेवा

उबरने ‘कनेक्टेड जर्नीज’ या नव्या सेवेचे सादरीकरण केले. या सुविधेद्वारे मेट्रो आणि रिक्षा, दुचाकी अशा सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांना एकाच प्रवास नियोजनात जोडण्याचा प्रयत्न आहे. प्रवाशांना मेट्रोपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मेट्रो स्थानकापासून इच्छित स्थळी जाण्यासाठी उपलब्ध पर्याय, अंदाजे प्रवास वेळ आणि भाडे एकाच अ‍ॅपवर पाहता येणार आहे. संबंधित प्रवासासाठी आवश्यक सेवा अ‍ॅपमधूनच बुक करता येणार आहे. प्रथम दिल्लीत ही सुविधा सुरू होणार असून टप्प्याटप्प्याने मुंबईसह पुणे, बंगळुरू, चेन्नई या शहरातही ही सुविधा सुरू होणार आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance