रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हडपसर (पुणे) ते दरभंगा दरम्यान चार विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यातील तीन स्थानकांवर थांबे
या विशेष गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना दिलासा
सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. पुण्याहून सुटणाऱ्या या विशेष गाड्यांना आता चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ येथे थांबे मिळणार आहेत.
Leave a Reply