पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फिलिपिन्स दौऱ्यावर राजधानी मनीला येथे पोहोचले आहेत. विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या दौऱ्याच्या निमित्ताने अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे — भारताचे एक हजार रुपये फिलिपिन्समध्ये किती होतात?
१००० रुपयांचे किती पेसो मिळतात?
सध्याच्या विनिमय दरानुसार भारताच्या एका रुपयाची किंमत जवळपास ०.६७७ फिलिपीन पेसो आहे. जसे भारताच्या चलनाला रुपया म्हटले जाते, तसेच फिलिपिन्सच्या चलनाला पेसो असे म्हटले जाते. भारताचे एक हजार रुपये फिलिपीन पेसोमध्ये बदलले तर त्याबदल्यात सुमारे ६७७ पेसो मिळतात. विनिमय दर हा बाजार मूल्यानुसार थोडाफार कमी-जास्त होत राहतो. फिलिपिन्सचे चलन हे भारताच्या चलनापेक्षा अधिक मजबूत असल्याचे सांगितले जाते.
१००० रुपयांमध्ये तिथे काय मिळते?
फिलिपिन्समध्ये महागाई प्रचंड असल्याने एक हजार रुपयांमध्ये तिथे फार काही खरेदी करता येत नाही. फार तर फार तेवढ्या पैशांमध्ये एकवेळच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकते. तसेच त्या पैशांमधून काही जवळपासची ठिकाणे फिरता येतात आणि चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स यांसारखे पदार्थ खरेदी करता येतात. या देशात अनेक भारतीय लोक काम करतात. त्यांना तिथे चांगला पगार मिळतो, त्यामुळे बचतही मोठ्या प्रमाणात होते. हे लोक बचत केलेले पैसे भारतामध्ये कुटुंबाला पाठवतात. समोर आलेल्या माहितीप्रमाणे या देशातील कामाचे वातावरणही चांगले आहे.
Leave a Reply