अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेतर्फे १३ नोव्हेंबरला शहाजीराजे क्रीडा संकुल येथे २६वा कौटुंबिक आनंद सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशीष सरवदे उपस्थित होते. त्यांनी मधुमेह या आजाराविषयी मार्गदर्शन करून उपस्थितांना आरोग्यविषयक मोलाचे संदेश दिले.
विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सन्मान
सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ऋतुजा परब (अभियांत्रिकी पदवीधर), प्रियांका परब (वकील), माधुरी शिंदे (आर्किटेक्ट), प्राजक्ता नाईक, संस्कृती निंबाळकर (कला व गायन) आणि संपदा कदम (शौर्य) यांचा गौरव करण्यात आला.
८२व्या वर्षीही निष्ठेने व्यवसाय
वयाच्या ८२व्या वर्षीही वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय निष्ठेने करणारे भाई तेंडुलकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष तथा अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेचे अध्यक्ष मधुसूदन सदडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर संघाचे कोषाध्यक्ष तथा सेनेचे सचिव रवींद्र चिले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एस मुर्गन, अबोध शिर्के, हरेश शाह, राजन यादव, प्रकाश कदम यांनी परिश्रम घेतले.
Leave a Reply