जळगाव येथे राजेश पुराणिक लिखित ‘स्वरपंचामृत’ या पुस्तकाचे प्रकाशन ग्वाल्हेर घराण्याचे गायक डॉ. विकास कशाळकर यांच्या हस्ते झाले. येथील छाया संगीत साधनाचे संचालक असलेल्या राजेश पुराणिक यांच्या शास्त्रीय संगीतातील दुर्मिळ गायन प्रकारांवरील या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानी विधीतज्ञ ॲड. सुशील अत्रे होते. कृपा प्रकाशनच्या संचालिका रेवती कुरंभट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
‘स्वरपंचामृत’मधील रचना गायकांसाठी उपयुक्त
धृपद, धमार, त्रिवट, तराणा, चतुरंग हे गीत प्रकार ख्याल गायनापेक्षा प्राचीन आहेत. या सर्व अप्रचलित गायन प्रकारांसंबंधी एकत्रित माहितीची रचना करून राजेश पुराणिक यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन डॉ. विकास कशाळकर यांनी केले. ‘स्वरपंचामृत’ या पुस्तकात धृपद, गत, तराणा, त्रिवट, चतुरंग आदी दुर्मिळ गायन प्रकारांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रृती देशपांडे यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. ‘स्वरपंचामृत’ या पुस्तकाच्या लेखनाबद्दल राजेश पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले. कृपा प्रकाशनच्या संचालिका रेवती कुरंभट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले.
रचना परकीय भाषेतही लिपीबद्ध व्हाव्यात
अध्यक्षीय भाषणात विधीतज्ञ सुशील अत्रे यांनी या रचना मराठीपुरत्या मर्यादित न राहता परकीय भाषेत लिपीबद्ध व्हायला हव्यात, असे विचार व्यक्त केले. डॉ. केतकी पुराणिक यांनी आभार मानले.
Leave a Reply