सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

‘अक्वान’ चक्रीवादळ शुक्रवारी आंध्र किनाऱ्याला धडकणार

बंगालच्या उपसागरात 'अक्वान' तीव्र चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या शुक्रवारी ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार आहे.

‘अक्वान’ चक्रीवादळ शुक्रवारी आंध्र किनाऱ्याला धडकणार

पुणे : बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरात वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. सोमवारी (ता. १६) सायंकाळनंतर या भागात अक्वान हे तीव्र चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी (ता. २०) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाची सध्याची स्थिती

उपसागरातील वादळी प्रणालीचे केंद्र गेल्या तासाला सहा किलोमीटर वेगाने वायव्य दिशेकडे सरकत आहे. सोमवारी (ता. १६) दुपारी या वादळी प्रणालीचे केंद्र श्रीलंकेतील त्रिंकोमलीपासून ६३० किलोमीटर ईशान्येकडे, तमिळनाडूतील चेन्नईपासून ७०० किलोमीटर आग्नेयेकडे, तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून ८०० किलोमीटर आग्नेयेकडे होते.

सोमवारी (ता. १६) सायंकाळनंतर दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात अक्वान चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता. १७) पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत आहेत.

शुक्रवारी किनारपट्टी ओलांडणार

शुक्रवारी (ता. २०) दुपारपर्यंत अति तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीवर नेल्लोर आणि तुनीदरम्यान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीला धडकताना वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १३० किलोमीटर राहणार असून, ताशी सुमारे १४५ किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झोत येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance