सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

चपात्या गोल आणि टम्म फुगण्यासाठी ५ सोप्या टिप्स

चपात्या गोल आणि छान फुगत नाहीत का? पीठ मळण्यापासून तव्यावर भाजण्यापर्यंतच्या या पाच सोप्या टिप्स वापरा — घरी गोल, मऊ आणि छान फुगलेल्या पोळ्या सहज बनतील.

चपात्या गोल आणि टम्म फुगण्यासाठी ५ सोप्या टिप्स

चपाती प्रत्येक घरात रोज बनते. कधी ती जाड होते, तर कधी तिचा आकार बरोबर येत नाही. अनेकांना चपाती बनवता येते, पण एकदम परफेक्ट गोल आणि टम्म फुगणारी चपाती बनत नाही. पीठ मळण्यापासून गोळे तयार करण्यापर्यंत आणि लाटण्यापर्यंतच्या प्रक्रियेत होणाऱ्या छोट्या चुका यामागे असू शकतात. पण पाच सोप्या टिप्स पाळल्या तर घरी अगदी गोल, मऊ आणि छान फुगलेल्या पोळ्या सहज बनवता येतील.

पीठ मळताना या गोष्टी लक्षात ठेवा

चपातीसाठी उत्तम पीठ असणं महत्त्वाचं आहे. पीठ कधीच जास्त घट्ट मळायचे नाही किंवा जास्त मऊही मळायचे नाही. मध्यम असं पीठ असावं. पीठ मळताना त्यात थोडंसं कोमट पाण्याचा वापर करावा, यामुळे छान कणिक तयार होते.

कणिक तयार झाल्यावर लगेचच चपाती बनवू नये. कणकेला थोडा वेळ तेल लावून कापड घालून मुरायला ठेवावे. साधारण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे. यामुळे कणिक सेट होते आणि चपाती लाटणं सोपं होतं.

पिठाच्या गोळ्याचा आकार आणि ठेवण, एक उत्तम गोल पोळी बनवण्यात मोठी भूमिका बजावतात. कणकेचे समान आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. प्रत्येक गोळा दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये धरून तो पूर्णपणे गोल होईपर्यंत फिरवावा. गोळ्याच्या पृष्ठभागावर कुठेही भेगा जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यानंतर तळव्याने हलकेच दाब देऊन तो थोडा चपटा करावा. चपटा केलेला हा गोळा सर्व बाजूंनी सारख्या जाडीचा असावा.

चपाती लाटताना आणि भाजताना काय करावे

सर्वात आधी सुक्के पीठ चपातीच्या गोळ्याला लावावे आणि मग चपाती लाटायला सुरुवात करावी. एकाच जागी चपाती गोल गोल फिरली पाहिजे. अधून-मधून चपातीला पालटून लाटावे.

चपाती गोल बनवायची म्हणून अनेकदा पातळ चपाती लाटली जाते. पण यामुळे चपाती तव्यावर फुगत नाही आणि कडक होते. जास्त सुक्के पीठसुद्धा वापरू नये.

चपाती फुगवण्यासाठी चपाती नीट भाजणंही महत्त्वाचं आहे. सर्वात आधी छान तवा तापवून घ्यावा. चपाती टाकल्यावर एका बाजूने हलकी भाजून घ्यावी. चपातीवर छोटे-छोटे फुगे आले की उलटून घ्यावी. दुसरी बाजू नीट भाजली गेली की, पुन्हा एकदा पोळी उलटून घ्यावी. आता पहिली बाजू मोठ्या आचेवर असताना, कापडाच्या साहाय्याने किंवा चिमट्याने हलक्या हाताने दाबावे. यामुळे पोळी व्यवस्थित फुगेल. पोळी तव्यावर खूप वेळ ठेवू नये, अन्यथा ती कडक होऊ शकते.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance