सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावात रविवारी सकाळी एक आश्चर्यकारक घटना घडली. आकाशातून तब्बल सात किलो वजनाचा बर्फाचा मोठा गोळा उसाच्या शेतात कोसळला. या घटनेमुळे शेतकरी आणि गावकरी प्रचंड घाबरले असून परिसरात कुतूहलाचे वातावरण आहे.
सकाळी साडेआठच्या सुमारास घटना
मोरणा नदीकाठावर समीर रमेश कुलकर्णी यांचे उसाचे शेत आहे. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बर्फाचा गोळा प्रचंड वेगाने आणि मोठ्या आवाजासह जमिनीवर आदळला. त्यामुळे शेतात मोठा खड्डा पडला. त्यावेळी गावडे हे शेतात ठिबक सिंचनाचे पाइप पसरत होते. अचानक झालेल्या या घटनेने त्यांनाही धक्का बसला.
सहा तासांनंतरही बर्फ वितळला नाही
विशेष म्हणजे घटना घडून सहा तास उलटल्यानंतरही बर्फ पूर्णपणे वितळला नव्हता. एवढ्या मोठ्या वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कसा पडला, याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. ही दुर्मिळ घटना पाहण्यासाठी गावकरी शेताकडे धाव घेत आहेत.
Leave a Reply