वैदिक पंचांगानुसार आज १६ नोव्हेंबर २०२६, सोमवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आज ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा असून ग्रहांचा दुर्मीळ संयोगही होत आहे. याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल, १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष ते कर्क राशीचे भविष्य
मेष : महिला अधिक रसिक होतील. सतत काहीतरी करत राहणे त्यांना खूप आवडेल.
वृषभ : सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रतीकांचा झगडा करण्यात धन्यता मानाल. उद्योग व्यवसायात कष्टाचे डोंगर उपसावे लागले तरी सर्व करण्याची तयारी दर्शवाल.
मिथुन : प्रयत्नाने यशप्राप्ती नक्की होईल. मान-सन्मान जरा जास्त टोकदार होतील. स्वतःबद्दल विनाकारण कल्पना करून घेऊ नका.
कर्क : कधीतरी अनपेक्षित उत्साह दाखवाल. घरामध्ये आवश्यक नसलेल्या गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
सिंह ते वृश्चिक राशीचे भविष्य
सिंह : अहंकार आणि हटवादी वृत्ती सोडून परिस्थितीशी दोन हात करायला सिद्ध होण्यातच पुरुषार्थ आहे, हे लक्षात ठेवा.
कन्या : स्त्रियांना जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल, त्यामुळे मानसिक अस्वस्थता थोडी वाढणार आहे.
तूळ : एखादी नवीन मोठी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. घरातील वयस्कर व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा त्रास सहन करावा लागेल.
वृश्चिक : काही नवीन गोष्टी करण्याचा विचार कराल. स्वतःबद्दलच्या अवाजवी मोठ्या कल्पनांना थारा देऊ नका.
धनु ते मीन राशीचे भविष्य
धनु : स्वतंत्र वृत्तीमुळे अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका. कोणतेही आर्थिक किंवा गुंतागुंतीचे निर्णय तडकाफडकी न घेण्यातच तुमचा फायदा आहे.
मकर : कष्ट करण्याच्या तुमच्या तयारीचा तुम्हाला फायदा होणार आहे. तुमची हुशारी आणि समयसूचकतेमुळे रेंगाळलेल्या कामांना चालना मिळेल.
कुंभ : महिलांना घरातील लोकांना समजून घ्यावे लागेल. त्यांच्या अंगी उपजत कला आहेत, त्यांना प्रोत्साहन मिळेल.
मीन : काहीतरी नवीन करण्याची योजना अमलात आणाल. वैवाहिक सौख्यामध्ये मानसिक समाधान मिळेल.
Leave a Reply