सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत आईसह दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय घडलं?
घरात भांडण झाल्यानंतर आई दोन वर्षांच्या लेकरासह घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर तिचा आणि मुलाचा शोध घेतला गेला. शोधाशोध केल्यानंतर आईसह मुलाचे मृतदेह विहिरीत आढळले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Leave a Reply