इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. इराणने बहरीनमधील रिफा हवाई तळावर ड्रोन हल्ला केला आहे. हा हवाई तळ अमेरिकेकडून वापरला जात आहे. बहरीनने इराणचे हल्ले परतवून लावल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामुळे आखाती प्रदेशातील तणाव वाढला असून, अनेक देशांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बहरीनवर हल्ला कसा झाला?
इराणने बहरीनच्या रिफा हवाई तळाला लक्ष्य करून ड्रोन हल्ला केला. हा तळ अमेरिकेच्या वापरात असल्याने हा हल्ला अमेरिकेला आव्हान देण्याचा प्रयत्न मानला जात आहे. अमेरिकेच्या अप्रत्यक्ष हवाई तळाला लक्ष्य करून इराण शह देण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. बहरीनने मात्र आपण इराणचे हल्ले परतवून लावले असल्याचा दावा केला आहे.
आखाती देशांची प्रतिक्रिया
बहरीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन काढून इराणच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. जॉर्डन आणि इजिप्त या दोन देशांनी बहरीनची बाजू घेत इराणच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. आखाती देशांतील अनेकांनीही इराणच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या हल्ल्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, पुढील घडामोडींकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply