सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबेगावात एक दुर्घटना घडली आहे. तेथील एका विहिरीत मातीचा ढिगारा कोसळल्याने चार कामगार विहिरीत अडकले आहेत.
अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. ही मोहीम सात तासांपासून सुरू असल्याचे समजते. कामगार सुखरूप बाहेर यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
श्रद्धांजलीच्या पोस्टवरून वाद
बचावकार्य सुरू असतानाच काही भाजप नेत्यांनी कामगारांना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट प्रसिद्ध केल्या. कामगारांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना अशा पोस्ट केल्या गेल्याने या प्रकारावर संताप व्यक्त होत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही अशी पोस्ट केली होती. मात्र नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. तरीही या प्रकारामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
बचावकार्य सुरू असताना अधिकृत माहिती येण्यापूर्वीच अशा पोस्ट करणे योग्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे. अडकलेल्या कामगारांच्या स्थितीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
Leave a Reply