रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

लातुरात सोमवारपासून ६५ वी राज्य नाट्यस्पर्धा

लातूर केंद्रावर सोमवारपासून ६५ व्या राज्य हौशी नाट्यस्पर्धेला सुरुवात होत आहे. पंधरा दिवस पंधरा नाटकांची मेजवानी मिळणार, स्पर्धा ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

लातुरात सोमवारपासून ६५ वी राज्य नाट्यस्पर्धा

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेला लातूर केंद्रावर सोमवार, १६ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. सलग पंधरा दिवस पंधरा नाटकांची मेजवानी लातूरच्या नाट्यरसिकांना दिवाळीच्या सुट्यांत मिळणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लातुरातही तसाच प्रतिसाद असून, यंदा पंधरा नाट्यसंघांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

यंदाची स्पर्धा अनेक अर्थाने लक्षवेधी

नाट्यसंघांचा विक्रमी सहभाग, नव्या कलावंतांची लक्षणीय भागीदारी, स्त्री कलावंतांचा वाढता प्रतिसाद, नव्या आशयाच्या नवनवीन संहिता आणि स्त्री कलावंतांचे दिग्दर्शनातील पदार्पण अशा वैशिष्ट्यांमुळे लातूर केंद्रावरील यंदाची राज्य नाट्यस्पर्धा चर्चेचा विषय ठरली आहे.

स्पर्धेतील नाट्यप्रयोग दगडोजी देशमुख सभागृहात सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहेत. दररोज एक नाट्यप्रयोग सादर होणार असून, स्पर्धा ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. प्रेक्षकांनी नाट्यप्रयोगांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

कोणती नाटके सादर होणार

या स्पर्धेत ‘लाडू’, ‘त्रिकोणाची चौथी बाजू’, ‘देवनवरी’, ‘पगला घोडा’, ‘टु इज कंपनी’, ‘आणि हे शहर सुद्धा’, ‘मृत्यू आधीच झाला होता’, ‘सृजनमयसभा’, ‘आवर्तन’, ‘रंगलेल्या गालाचा मुका’, ‘बेईमानी’, ‘खेळीमेळी’, ‘वात्सल्यम’, ‘नथिंग टु से’ आणि ‘चाफा सुंगधी’ ही नाटके सादर होणार आहेत. विविध विषयांवर आधारित या नाटकांच्या रंगीत तालमी शहरात ठिकठिकाणी सुरू आहेत.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance