धुळे शहरात थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने जनजातीय गौरव दिवस साजरा झाला. महाराष्ट्र राज्य अनुसूचित ठाकूर जमात सेवा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.
उलगुलान लढ्याचे स्मरण
ब्रिटिश राजवटीच्या काळात आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी बिरसा मुंडा यांनी पुकारलेल्या उलगुलान लढ्याची आठवण या वेळी करण्यात आली. छोटानागपूर कुळवहिवाट कायद्याच्या ऐतिहासिक घडामोडींवरही प्रकाश टाकण्यात आला.
अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनतेविरुद्ध जनजागृती करत शिक्षण, स्वच्छता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या बिरसाइत पंथाच्या कार्याचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला शहराध्यक्ष नितीन ठाकूर, तालुकाध्यक्ष जगदीश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष किरण भामरे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, ज्येष्ठ पदाधिकारी देवानंद ठाकूर, हेमराज ठाकूर, भूपेंद्र वाघ, महेश ठाकूर, गिरीश महाले, किरण वाघ, पंकज भामरे, मनोज सूर्यवंशी, संदीप ठाकूर आणि अतुल भामरे उपस्थित होते.
Leave a Reply