रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

हिंगोली ग्रंथालयात दीडशेहून अधिक दिवाळी अंकांचे प्रदर्शन

हिंगोली जिल्हा ग्रंथालयात दीडशेहून अधिक दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले. साहित्यिक भ. मा. परसवाळे यांच्या हस्ते उद्घाटन; दहा दिवस विनामूल्य खुले राहणार.

हिंगोली ग्रंथालयात दीडशेहून अधिक दिवाळी अंकांचे प्रदर्शन

दिवाळीनिमित्त वाचकांना दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी हिंगोली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने महसूल कॉलनी येथील कार्यालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक भ. मा. परसवाळे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात दीडशेपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक विलास वैद्य, अण्णा जगताप, पंडित अवचार, गोडाती काळे, संतोष परसवाळे, शिवाजी पंडित, संतोष ससे यांच्यासह शहरातील साहित्यिक व वाचक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मराठी साहित्यविश्वातील दिवाळी अंकांची शतकाहून अधिक काळाची समृद्ध परंपरा, बदलते स्वरूप आणि महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीतील त्यांचे योगदान अधोरेखित केले. नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात दिवाळी अंकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहा दिवस विनामूल्य प्रदर्शन

प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले. हे प्रदर्शन पुढील दहा दिवस विनामूल्य खुले राहणार आहे. सध्या शाळा व महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या असल्याने विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमींनी येथे भेट देऊन साहित्यिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिकाधिक नागरिकांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance