शहादा तालुक्यातील विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन माजी खासदार डॉ. हीना गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले. माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी मंजुरी मिळवून दिलेली ही विकासकामे आहेत. यात शहादा तालुक्यातील प्रकाशा-धूरखेडा-भादे येथील लहान पूल व रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच धूरखेडा येथील समाजमंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे-पाटील, गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
गावविकासाला कायम प्राधान्य
याप्रसंगी ग्रामस्थांना उद्देशून केलेल्या भाषणात डॉ. हीना गावित यांनी सांगितले की, माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी त्यांच्या कार्यामध्ये कायमच ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले. प्रत्येक गावाचा विकास व्हावा, या दृष्टीने आपल्या खासदारकीच्या काळातदेखील सदैव प्राधान्य दिले गेले. अनेक गावांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणता आले. यापुढेही गावांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल, असे त्या म्हणाल्या.
पाणी, वीज, रस्ते यांना महत्त्व
डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी, वीज, रस्ते याबरोबरच अन्य विकासकामांना महत्त्व दिले गेले. ग्रामीण लोकांचे जीवन सहज सोपे करण्यासाठी ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण व ग्रामविकास हाच आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे, असे त्या म्हणाल्या.
Leave a Reply