अभिनेते अशोक सराफ सध्या आदि अनंत या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांनी आजोबांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नातवाची भूमिका साकारली आहे. पण मराठी सिनेसृष्टीत एक काळ असा होता, जेव्हा दिवंगत अभिनेते दादा कोंडके आणि अभिनेते अशोक सराफ यांनी रुपेरी पडद्यावर राज्य केले होते. दादा कोंडके यांचे अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर यशस्वी ठरले. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये दुहेरी अर्थाचे विनोद असायचे. अशोक सराफ यांनीही दादा यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी दादा कोंडके यांच्या दुहेरी अर्थाच्या विनोदांवर स्वतःचे मत मांडले आहे.
तीन चित्रपट आणि दुहेरी अर्थाची सुरुवात
दादा कोंडके यांचा तो काळ असा होता, जेव्हा त्यांनी सात ते आठ जुबली हीट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले होते. त्या काळात दादांनी सिनेसृष्टी गाजवली होती. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनीही महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचे मनोरंजन केले. मात्र, त्यानंतर अशोक सराफ आणि दादा कोंडके कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे तेव्हा नेमके काय झाले, दोघे एकत्र का दिसले नाहीत, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. यावर एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी मोठे वक्तव्य केले होते. दादा कोंडके यांच्यासोबतच्या चित्रपटांबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले, पहिला चित्रपट पांडू हवलदार, त्यामध्ये दुहेरी अर्थ असे काहीही नव्हते. दुसरा चित्रपट तुमचं आमचं जमलं, त्यात त्यांनी काम केले. त्यामध्ये त्या खलनायकाच्या भूमिकेत होत्या. म्हणून त्या चित्रपटातही कोणताही दुहेरी अर्थ नव्हता. राम राम गंगाराम हा तिसरा चित्रपट, त्या चित्रपटापासून दुहेरी अर्थाला सुरुवात झाली आणि तोच दादांसोबतचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर पुढे दुहेरी अर्थाचे चित्रपट सुरूच राहिले.
चौथा चित्रपट का झाला नाही?
राम राम गंगारामनंतर दादा कोंडके यांनी चौथ्या चित्रपटासाठी तुम्हाला विचारले नाही की चित्रपटच बदलले, असे अशोक सराफ यांना विचारण्यात आले. यावर अशोक सराफ म्हणाले, चित्रपटच बदलले. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांनीच मला घेतले नाही. तेव्हा त्यांचे असे झाले की, बरे झाले नाही विचारले. विचारले असते तर त्यांना त्या चित्रपटात काम करावे लागले असते. त्यानंतर असे झाले की, असे नको, तसे नको, असेही त्यांनी सांगितले. पुढे अशोक सराफ म्हणाले, त्यानंतर अनेक वर्षांनंतर दादांनी त्यांना पुन्हा विचारले. पण त्यांना पटकथा दिलीच नाही. मग त्यांनी हळूच चोरून संपूर्ण पटकथा वाचली आणि तेव्हा त्यांना कळले की, ही भूमिका त्यांनी पूर्वी साकारली आहे. त्यामुळे ती पुन्हा साकारण्यात काय अर्थ आहे, असा विचार करून त्यांनी स्पष्ट नकार दिला. तो चित्रपट त्यांनी केला नाही. तर अशोक सराफ आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत.
Leave a Reply