घर सजवताना आपण प्रत्येक गोष्टीची निवड विचारपूर्वक करतो. भिंतींचे रंग, पडदे आणि फर्निचर यांसोबतच फ्रिजसारख्या वस्तूंचा रंगही आवडीने निवडला जातो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तूंचे रंगही महत्त्वाचे मानले जातात.
आपल्या आजूबाजूला असलेल्या रंगांचा परिणाम आपल्या मनःस्थितीवर होतो, असे वास्तुशास्त्र आणि रंगांच्या अभ्यासात सांगितले जाते. त्यामुळे घरासाठी फ्रिज घेताना त्याच्या रंगाची निवडही विचार करून करावी, असा सल्ला दिला जातो.
रंगांचा मनावर होणारा परिणाम
वास्तुशास्त्रानुसार रंगांचा संबंध पंचतत्त्व आणि ग्रहांशी जोडला जातो. या रंगांचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर आणि मनावर होऊ शकतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक वस्तूचा रंग निवडताना त्यामागील अर्थ समजून घेणे महत्त्वाचे मानले जाते.
फ्रिजचा रंग निवडताना काय लक्षात घ्यावे?
फ्रिज घेताना केवळ आवड लक्षात न घेता वास्तुशास्त्रात सांगितलेले नियमही लक्षात घ्यावेत, असे सांगितले जाते. रंगाची योग्य निवड घरातील वातावरणावर सकारात्मक परिणाम करू शकते, अशी मान्यता आहे.
Leave a Reply