बांगलादेशातील एका तरुणाच्या धाडसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. रस्ता ओलांडत असलेले एक मांजर भरधाव वाहनाखाली येण्याच्या बेतात असताना या तरुणाने क्षणाचाही विलंब न करता पुढे येऊन त्याचा जीव वाचवला. रादवान नावाच्या या तरुणाची ही कृती पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत.
रस्त्यावरून जात असताना रादवान यांना रस्ता ओलांडणारे मांजर दिसले. त्याच वेळी एक भरधाव गाडी त्या दिशेने येत होती. ही धोक्याची परिस्थिती लक्षात येताच रादवान यांनी तातडीने वाहतूक थांबवली आणि मांजराला उचलून रस्त्याच्या सुरक्षित बाजूला नेले. त्यांच्या या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मांजराचा जीव वाचला.
सेकंदभराचा उशीर ठरला असता जीवघेणा
मांजर रस्त्याच्या मध्यभागी असताना गाडी वेगाने जवळ येत होती. अशा वेळी एका सेकंदाचा उशीरही मांजरासाठी जीवघेणा ठरला असता. मात्र रादवान यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पाऊल उचलले आणि मांजराला सुरक्षित स्थळी नेले.
धाडसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर वेगाने पसरत आहे. रस्त्यावरील एका छोट्या जीवासाठी दाखवलेले हे धाडस आणि संवेदनशीलता अनेकांना भावली आहे. प्राण्यांप्रती असलेली काळजी आणि वेळीच घेतलेला योग्य निर्णय यामुळे हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
Leave a Reply