अनेकांना असा प्रश्न पडतो की गोड खात नाही, तरीही रक्तातील साखरेचे प्रमाण का वाढते? याचे उत्तर अनेकदा दररोजच्या सवयींमध्ये दडलेले असते. डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ गोड टाळणे पुरेसे नाही, तर संपूर्ण दिनचर्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण केवळ साखरेमुळेच वाढते असे नाही. खाण्याच्या वेळा, झोप, शारीरिक हालचाल आणि दैनंदिन ताण यांचाही त्यावर परिणाम होतो. त्यामुळे डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी आपल्या रोजच्या रुटीनमधील कोणत्या गोष्टी साखर वाढवतात, हे ओळखणे महत्त्वाचे ठरते.
रोजच्या चुका टाळा
डायबिटीज नियंत्रणासाठी दररोजच्या रुटीनमध्ये काही चुका टाळणे उपयुक्त ठरू शकते. वेळेवर जेवण, नियमित हालचाल आणि पुरेशी झोप या गोष्टी रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत बदल केल्यास साखर नियंत्रणात ठेवणे सोपे जाते.
मात्र कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे एकाच उपाय सर्वांना लागू होईलच असे नाही.
Leave a Reply