सध्या सोशल मीडियावर एका नवरीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरी लग्नाआधी हळद सोडून चिखलाने माखलेली पाहायला मिळत आहे. लग्नसोहळ्यात एका नवरीसोबत लग्नाआधी असे काही घडले की, तिच्या लग्नाची सुरुवात हळदीने होण्याऐवजी चिखलाने झाली. नवरी-नवरदेवाला घेऊन जाणारी कार अचानक रस्त्यावरून शेतातल्या चिखलात पडली. यामध्ये नवरीचा पांढरा शुभ्र पोशाख संपूर्ण चिखलाने माखलेला पाहायला मिळाला.
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना व्हिएतनाममधील तुयेन व्कांग प्रांतात घडली. ही घटना १० नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता घडली. २१ वर्षीय ली वान व्हिएत आणि त्याची नवरी १९ वर्षीय डॅम थी शुआन लग्नासाठी नवरदेवाच्या घरी जात होते. लग्नघर अवघ्या काही मिनिटांवर असताना त्यांची कार अचानक रस्त्यावरून घसरली आणि जवळपास एक मीटर खाली असलेल्या भातशेताच्या मळ्यात पडली.
नवरी आणि पोटातील बाळ दोघेही सुखरूप
अपघातानंतर नवरीला नवरदेवाच्या घरी नेण्यात आले. तिथे तिने अंघोळ करून कपडे बदलले. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी कुटुंबीय तिला रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर नवरी आणि पोटातील बाळ दोघेही सुखरूप असल्याचे कळले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांना हसावे की रडावे हेच कळले नाही. अनेक जण हसले, तर काहींनी नवरीच्या पोशाखाबद्दल आणि आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या अशा घटनांविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे.
Leave a Reply