दिवाळी पाडव्यानिमित्त नंदुरबारमध्ये ‘पाडवा पहाट’ कार्यक्रम रंगला. लायन्स ग्रुप आणि संकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम हि. गो. श्रॉफ विद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आला होता. शहरातील स्थानिक कलाकारांनी विविध भक्तिगीते आणि भावगीते सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यामुळे पाडव्याची पहाट श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. निवृत्त पोलिस उपअधीक्षक संजय महाजन, चंद्रशेखर चव्हाण, लायन्सचे अध्यक्ष किरण पाटील, रागिणी पाटील, अनिल पाटील, डॉ. सुहास भावसार, संकल्प ग्रुपचे कैलास मराठे, सारंग रोकडे, डॉ. माधव कदम, पंकज पाठक, चंपालाल चौधरी आणि सतीष पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
अर्णव पाटील या कलाकाराने बासरीवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्याला निशांत बोरसे आणि पुष्कर पाटील यांनी बासरीवर, तर मोहित वारुडे यांनी तबल्यावर साथ दिली.
स्थानिक कलाकारांची गीते
नीलेश चव्हाण, प्रग्नेश दवे, पूनम बेडसे, रणजित राजपूत, चेतना पाटील, मीनल म्हसावदकर, राकेश कलाल, चंद्रशेखर चव्हाण, डॉ. राजेश कोळी, डॉ. संदीप बोरसे, डॉ. अविनाश पाटील, प्रा. शुभांगी देवकर, डॉ. जयंत शहा, रवी सूर्यवंशी, दिनेश वाडेकर आणि डॉ. गौरवी बोरसे यांनी विविध गीते सादर केली.
कार्यक्रमाला डॉ. श्रीराम दाऊतखाने, विजय पवार, अजय वळवी, नितीन चिनावलकर यांच्यासह अनेक रसिक श्रोते उपस्थित होते. चेतना पाटील, पूनम बेडसे, मिनल म्हसावदकर आणि डॉ. गौरवी बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. संकल्प ग्रुपचे अध्यक्ष कैलास मराठे यांनी आभार मानले. डॉ. रोशन भंडारी आणि सुरेश जैन यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
Leave a Reply