शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नेहरू जयंती: नाशिकमध्ये काँग्रेसतर्फे अभिवादन

पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती नाशिकमध्ये शहर काँग्रेसतर्फे साजरी करण्यात आली. काँग्रेस भवन आणि नेहरू गार्डन येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नेहरू जयंती: नाशिकमध्ये काँग्रेसतर्फे अभिवादन

आधुनिक भारताचे शिल्पकार आणि देशाचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती नाशिकमध्ये शहर काँग्रेसतर्फे साजरी करण्यात आली. काँग्रेस भवन आणि नेहरू गार्डन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात शहराध्यक्ष नीलेश खैरे यांच्या हस्ते नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी चाचा नेहरू अमर रहे आणि जय जवान, जय किसान अशा घोषणा देत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

नेहरूंचे योगदान मोलाचे

याप्रसंगी बोलताना खैरे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगती साधण्यात पंडित नेहरूंचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी उभारलेल्या संस्थांमुळेच आज भारत प्रगतिपथावर आहे. लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दूरदृष्टीचा भक्कम पाया

माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वातंत्र्योत्तर काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाची धुरा सांभाळून पंडित नेहरूंनी विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि औद्योगिकीकरणाचा भक्कम पाया रचला. आज देश ज्या प्रगतिपथावर उभा आहे, त्यामागे नेहरूंची दूरदृष्टी आहे. नेहरूंनी दिलेली संवैधानिक आणि लोकशाही मूल्ये जपावीत, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी शहर उपाध्यक्ष प्रा. भालचंद्र पाटील, प्रा. आदिनाथ नागरगोजे, प्रल्हाद मिस्री, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. मंगेश लहामगे, प्रभाकर धात्रक, युवक काँग्रेसचे जयेश पोकळे, महिला काँग्रेसच्या स्वाती जाधव, अरुण दोंदे, हनीफ बशीर, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष अभिजित राऊत, मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष झाकिर अत्तार, ओबीसी शहराध्यक्ष सुदेश मोरे, एनएसयूआयचे रोहित वाघ, स्वरूप पिसे, दत्ता सोनवणे, प्रा. नारायण पाटील आणि अनिल बहोत आदी उपस्थित होते.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance