दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. राजधानीच्या राजकीय वर्तुळात जोरदार खलबते सुरू असून बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. त्याचवेळी मंत्रिपदावर असलेल्या नेत्यांची धाकधुक वाढली आहे.
अनेक मंत्र्यांची उचलबांगडी होणार?
हाती आलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमधून अनेक मंत्र्यांची उचलबांगडी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एनडीएमधील मित्रपक्षांना मंत्रिपदे दिली जातील, अशी माहिती समोर आली आहे.
वरिष्ठ नेत्यांची बैठक
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली असून त्यात कोणत्या मंत्र्यांना डच्चू दिला जाईल आणि मित्रपक्षातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद दिले जाईल, याची चर्चा झाली. एनडीएमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply