रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

वास्तुशास्त्र : कर्ज फेडण्यासाठी करा हा सोपा उपाय

वास्तुशास्त्रात कर्ज फेडण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. तांब्याचे नाणे खिशात ठेवणे आणि नित्यनियमाने दररोज गणपतीची उपासना करणे, हे त्यातील उपाय आहेत.

वास्तुशास्त्र : कर्ज फेडण्यासाठी करा हा सोपा उपाय

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांवर वास्तुशास्त्रात साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांच्या बाबतीत असे घडते की, प्रचंड कष्ट करूनही पैसा हातात टिकत नाही. तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खर्च होतो आणि महिन्याच्या शेवटी तिजोरीत खडखडाट असतो. काही जणांनी कर्ज घेतलेले असते. ते फेडण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करतात, तरीही त्यांना कर्ज फेडण्यात यश येत नाही. अशा लोकांसाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगितले आहेत. या उपायांच्या मदतीने अडलेली कामे पूर्ण होतील आणि कितीही कर्ज असले तरी ते दूर होईल, असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे.

तांब्याच्या नाण्याचा उपाय

अनेकजण कर्ज घेतात, परंतु नंतर ते फेडण्यात अनेक अडथळे निर्माण होतात. खूप प्रयत्न करूनही कर्ज लवकर फिटत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हाही अशा समस्या जाणवू शकतात. कर्ज लवकर फिटावे यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगितला आहे. एक तांब्याचे नाणे घ्या, त्या नाण्यावर स्वस्तिकचे चिन्ह काढा आणि हे नाणे कायमस्वरूपी आपल्या खिशात ठेवा. या उपायामुळे कर्ज दूर होण्यास मदत होईल, असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे.

गणपती उपासना

आर्थिक प्राप्तीसाठी नित्यनियमाने गणपती उपासना करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला आहे. दररोज नित्यनियमाने गणपती मंत्राचा जप करावा. त्यासोबतच दररोज गणपतीला एक लाल फूल अर्पण करावे. गणपती बापाच्या कृपेने घराची भरभराट होते आणि कर्ज दूर होते, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे.

टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल कोणताही दावा केला जात नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा दिला जात नाही.

Updated: 14 Nov 2026 10:14 PM

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance