जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुल संचलित एकलव्य स्क्वॉश अकॅडमीच्या खेळाडूंनी शालेय विभागस्तरीय स्क्वॉश स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाच्या जोरावर अकॅडमीच्या २१ खेळाडूंची उंड्री (पुणे) येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटांचा समावेश आहे.
मुलींच्या गटातील यश
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात वरुनिका बोडके हिने प्रथम, रुहिका पाटील हिने द्वितीय, श्रेयसी हिंगणकर हिने चौथा, तर जिनल अग्रवाल हिने पाचवा क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात इशा देशपांडे हिने प्रथम, पालवी मांडे हिने चौथा, तर पलक चौधरी हिने पाचवा क्रमांक पटकाविला. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात हर्षित पाटील हिने प्रथम, अर्पिता कदम हिने तृतीय, तर अनौष्का वाणी हिने पाचवा क्रमांक मिळविला.
मुलांच्या गटातील यश
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धार्थ शर्मा प्रथम, पार्थ विसपुते द्वितीय, अर्णव दांडगे तृतीय, पार्थ दंडगव्हाळ चौथा आणि परम पाटील पाचव्या क्रमांकावर राहिला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात यश हेमलाणी याने प्रथम, उत्कर्ष वाघ याने तृतीय, भैरव महाजन याने चौथा, तर वेद पाटील याने पाचवा क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धेश खांड्रे याने प्रथम, तर आरुष चौधरी याने द्वितीय क्रमांक पटकाविला.
या सर्व खेळाडूंना स्क्वॉश विभागाचे मुख्य प्रशिक्षक प्रा. प्रणव बेलोरकर आणि शुभम शिसोदे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, एकलव्य स्केटिंग अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक डॉ. रणजीत पाटील तसेच खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply