नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मोडलगाव येथे एका कुटुंबातील आठ चिमुकल्यांना गंभीर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेताच्या बांधावर खेळताना मुलांनी नकळत एरंडीच्या बिया खाल्ल्या आणि त्यानंतर त्यांना विषबाधा झाली.
एका मुलीचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
या विषबाधेत चार वर्षांच्या एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विषबाधा झालेल्या मुलांमध्ये पाच मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे. त्यापैकी एका मुलाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
आई-वडील परजिल्ह्यात, मुलं घरीच
मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील आई-वडील रोजगारासाठी परजिल्ह्यात गेले होते. घरात मुलांची काळजी घेणारे वृद्ध नातेवाईक गुरांना चरण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी शेताच्या बांधावर खेळत असलेल्या मुलांनी एरंडीच्या बिया खाल्ल्या.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply