अनेकदा आपण जेवत असताना, पाणी पिताना किंवा अगदी सहज बसलो असताना अचानक आपल्याला उचकी लागते. उचकी लागल्यानंतर काही सेकंदांत किंवा मिनिटांत ती थांबते, पण कधीकधी ती बऱ्याच वेळ राहू शकते. अशावेळी त्यामागील प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
उचकी का लागते?
आपल्या छाती आणि पोटाच्या पोकळीत ‘डायाफ्राम’ नावाचा एक महत्त्वाचा स्नायू असतो, जो श्वासोच्छ्वास घेण्यासाठी मदत करतो. जेव्हा या स्नायूमध्ये अचानक अनैच्छिक आकुंचन होते, तेव्हा हवेचा लोट वेगाने फुफ्फुसांत शिरतो. यामुळे हवेचा मार्ग अचानक ब्लॉक होऊन तोंडातून ‘हिक’ आवाज बाहेर पडतो. हाच आवाज म्हणजे उचकी.
उचकी लागण्याची प्रमुख कारणे
खूप वेगाने खाल्ल्यास किंवा जेवताना हवेचे कण पोटात गेल्यास डायाफ्रामवर ताण येतो आणि उचकी लागू शकते. अति तिखट, मसालेदार पदार्थ किंवा एकदम थंड पाण्यामुळे पोटाची नसा उत्तेजित होतात आणि उचकी लागते. सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स अति प्रमाणात प्यायल्याने पोटात गॅस तयार होऊन उचकी येऊ शकते. याशिवाय अचानक खूप जास्त आनंद होणे, भीती वाटणे, चिंता किंवा मानसिक ताण यामुळे देखील मज्जातंतू उत्तेजित होऊन उचकी येऊ शकते.
उचकी सहसा काही वेळातच थांबते. येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply