दोडामार्ग बाजारपेठेत मंगळवारी पहाटे एका तरुणाने वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली. पत्नीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या तरुणाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
या तरुणाने व्यापारी प्रशांत नाईक (केरकर) यांच्या कारची दर्शनी काच लाकडी रिपेच्या साहाय्याने फोडली.
दोन तासांत संशयित ताब्यात
घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि अवघ्या दोन तासांत संशयित तरुणाला ताब्यात घेतले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply