मिरज येथील मार्तंडेश्वर चौक परिसरातील डोणगे गल्ली येथे मंगळवारी भरदुपारी एका ५५ वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
इलाही लालसाब शेख (वय ५५, रा. डोणगे गल्ली, मिरज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सुतारकाम करून उदरनिर्वाह करत होते.
हल्लेखोर फरार; पोलिसांचा शोध सुरू
या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply