गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रात्री २ वाजता तरुणी काय मागवतात? डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ

मध्यरात्री अन्न मागवणाऱ्या तरुणींवर डिलिव्हरी बॉयने मजेशीर व्हिडिओ बनवला आहे. 'भैय्या, बेल वाजवू नका' ही सूचना प्रत्येक दुसऱ्या ऑर्डरमध्ये असते, असे तो सांगतो.

रात्री २ वाजता तरुणी काय मागवतात? डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ

आजकाल मध्यरात्री भूक लागणे आणि त्यानंतर लगेच फोनवरून ऑनलाइन ऑर्डर देणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. मेट्रो शहरांमध्ये तर हे प्रकार सर्रास घडतात. तरुण असो की तरुणी असो, एकटे राहणारे असो की कुटुंबासह राहणारे असो, रात्री कितीही वाजता खाण्यापिण्याच्या ऑनलाइन ऑर्डर दिल्या जातात. पण रात्री २ किंवा ३ वाजता ऑर्डर दिल्यानंतर तुमच्या घरी ते पदार्थ घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय काय विचार करतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

सोशल मीडियावर सध्या एका डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अत्यंत मजेशीर आहे आणि त्यामुळे त्याची जोरदार चर्चा होत आहे. या तरुणाने मध्यरात्री ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांची, त्यातही खास करून तरुणींची पोलखोल केली आहे. मध्यरात्री महिला काय मागवतात, हेच या डिलिव्हरी बॉयने बिनधास्तपणे सांगून टाकले आहे.

सर्वाधिक ऑर्डर मुलींकडून

इन्स्टाग्रामवरील @the_deliveryboy81 या खात्यावर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडिओतील तरुणाच्या मते तो एक डिलिव्हरी एजंट आहे. त्याने अत्यंत मजेशीर शैलीत हा व्हिडिओ तयार केला आहे. मध्यरात्री सर्वाधिक ऑर्डर कुणाकडून येतात, याचा खुलासा त्याने यात केला आहे. मध्यरात्री सर्वाधिक ऑर्डर मुलींकडून येत असल्याचे त्याने सांगितले. रात्रीच्या वेळी तरुणी काय मागवतात आणि कसे मागवतात, हे त्याने अत्यंत लडिवाळपणे रागावत सांगितले आहे.

भैय्या, बेल मत बजाना प्लीज

या डिलिव्हरी बॉयने मुलींची पोलखोल करतानाच त्यांची खिल्लीही उडवली आहे. जेव्हा मी एखाद्या मुलीची ऑर्डर घेतो, तेव्हा लगेच मला एक खास सूचना मिळते. भैय्या, जेव्हा तू सोसायटीत येशील तेव्हा फोन कर, पण घराची बेल वाजवू नकोस, असे हा डिलिव्हरी बॉय हसत सांगतो. लोक घरी खाण्याचे पदार्थसुद्धा चोरून मागवतात. घरच्यांना कळू नये म्हणून त्यांची ही युक्ती असते, असे सांगतानाच बेल वाजवू नको, अशी अनेकदा विनंती केली जाते. ही अत्यंत सामान्य विनंती आहे. प्रत्येक दुसऱ्या ऑर्डरमध्ये ही सूचना असतेच, असेही त्याने म्हटले आहे.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance