आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही महत्त्वाच्या वाटतात. पती-पत्नीचे नाते कसे असावे, मैत्रीचे नाते कसे असावे, मुलाने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ कसा करावा, आई-वडिलांनी मुलांवर कसे संस्कार करावेत, अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगून ठेवल्या आहेत.
## त्याग हाच नात्याचा पाया
चाणक्य म्हणतात, जर तुम्हाला कुठलेही नाते तुटू द्यायचे नसेल, ते नाते आणि ती व्यक्ती कायम आपल्या आयुष्यात राहावी असे वाटत असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्याग करायला शिकले पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या नात्याला अधिक बळकटी देते, असे चाणक्य म्हणतात. माणसाने आयुष्यात कायम चार गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ज्यामुळे तुमचे नाते कायम टिकून राहील, असेही चाणक्य यांनी म्हटले आहे.
## या चार गोष्टी लक्षात ठेवा
**विश्वास:** चाणक्य म्हणतात, नाते कोणतेही असो, त्या प्रत्येक नात्याचा विश्वास हा कणा असतो. जर तुमचा एकमेकांवर विश्वास असेल तर तुमच्या नात्यामध्ये कधीही दुरावा येणार नाही. मग भलेही तुमचे नाते मैत्रीचे असो, पती-पत्नीचे असो अथवा भावाचे असो. जर तुमच्या नात्यामध्ये विश्वास असेल तर असे नाते कधीही तुटत नाही. ते अधिकाधिक बळकट होत जाते, असे चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे.
**संशय:** चाणक्य म्हणतात, जर तुम्हाला तुमचे नाते महत्त्वाचे वाटत असेल आणि तुम्हाला ते कोणत्याही किमतीवर टिकून ठेवायचे असेल तर अशा नात्याबद्दल कधीही तुमच्या मनात संशय निर्माण होऊ देऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्या मनात संशय आला, त्याच दिवसांपासून तुमचे नाते कमकुवत होण्यास सुरुवात झालीच म्हणून समजा.
**अहंकार:** चाणक्य म्हणतात, नात्यामध्ये कधीही अहंकार नसावा. जिथे अहंकार असतो, तिथे नाते फार काळ टिकत नाही. त्यामुळे एकमेकांचा नेहमी आदर केला पाहिजे.
**विचार:** चाणक्य म्हणतात, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते, हे विचार इतरांवर थोपवण्याचा प्रयत्न करू नका. या उलट समोरच्या व्यक्तीचे विचार देखील ऐकून घ्या.
वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली असून चाणक्य नीतीतील पारंपरिक शिकवणीवर आधारित आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply