मुलगी जन्माला आली की तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या भविष्याची चिंता पालकांना असते. तिच्यासाठी आतापासूनच गुंतवणूक केली तर भविष्यात मोठी रक्कम उभी राहू शकते. त्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा उत्तम पर्याय आहे.
सुकन्या समृद्धी योजना काय आहे?
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची मुलींसाठी असलेली छोटी बचत योजना आहे. मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी आर्थिक तरतूद करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुलगी १० वर्षांची होण्यापूर्वी पालक तिच्या नावाने खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडू शकतात.
या योजनेत कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये जमा करता येतात. दरमहा ८ हजार रुपये जमा केल्यास वर्षाला ९६,००० रुपये गुंतवले जातात.
२१ वर्षांनी किती पैसे मिळतात?
सध्या या योजनेवर वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळते. हे व्याज २१ वर्षे कायम राहिल्यास २१ वर्षांनंतर सुमारे ४४.४ लाख रुपये मिळू शकतात. मात्र ४४ लाख रुपये मिळणे हे व्याजदरावर अवलंबून असेल आणि रक्कम कमी-जास्तही असू शकते.
खाते कोण उघडू शकते?
मुलगी १० वर्षांची होण्यापूर्वी तिच्या नावाने हे खाते उघडता येते. एका मुलीच्या नावाने एक खाते उघडता येते. सामान्यतः एका कुटुंबातील दोन मुलींसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या जन्मासंबंधीच्या नियमांनुसार काही अपवाद आहेत.
सुकन्या समृद्धी खात्याची मुदत खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षांनी पूर्ण होते. मात्र मुलगी १८ वर्षांची झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर, यापैकी जे आधी होईल त्या वेळी उच्च शिक्षणासाठी खात्यातील मागील आर्थिक वर्षांच्या अखेरीस असलेल्या रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply