नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत हे तपासण्यासाठी ईपीएफओच्या संकेतस्थळावर जाण्याची गरज नाही. कर्मचारी आता व्हॉट्सॲपवरूनच पीएफ बॅलन्स तपासू शकतात.
व्हॉट्सॲपवर कोणत्या सुविधा मिळणार?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांसाठी ही नवी सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त या सुविधेचे उद्घाटन केले. या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना चार महत्त्वाच्या सेवा मिळतील — पीएफ बॅलन्स तपासणे, शेवटचे पाच व्यवहार पाहणे, पासबुक डाउनलोड करणे आणि प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेशी संबंधित मार्गदर्शन.
पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?
सर्वात आधी अधिकृत क्रमांक +९१ ८७९६४४१८०० सेव्ह करा. त्यानंतर व्हॉट्सॲपवर जाऊन या क्रमांकावर Hi असा संदेश पाठवा. त्यानंतर भाषेचा पर्याय निवडा. पडद्यावर पीएफ बॅलन्स, शेवटचे पाच व्यवहार आणि पासबुक डाउनलोड असे पर्याय दिसतील. हवा असलेला पर्याय निवडल्यानंतर आलेला ओटीपी टाका. त्यानंतर पीएफ खात्याची संपूर्ण माहिती लगेच मिळेल. खात्याच्या सुरक्षिततेसाठी केवळ ईपीएफओच्या अधिकृत क्रमांकाचाच वापर करा. यूएएन पासवर्ड, बँक तपशील आणि ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply